गोंदिया जिल्ह्यातील वाघाच्या शिकारी प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एकाला अटक

0
157

वनविभाग अलर्ट मोडवर, गोंडपिपरी येथून एका ट्रॅक्टर चालकाला अटक आणखी अडकण्याची शक्यता

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):

महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर झालेल्या वाघाच्या शिकारीचे चंद्रपूर कनेक्शनच्या तपासात समोर आले आहे. तपासात वाघाच्या अवयवांच्या तस्करीच्या आरोपींनी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील एका ट्रॅक्टर चालकाशी संवाद साधल्याची बाब उघड आली. याआधारे तपास पथकाने सोमवारी गोंडपिपरी गाठून धर्मराव चापले (४२, रा. चेकपिपरी) याला अटक केली आणि पुढील चौकशीसाठी छत्तीसगडला नेण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलात शिकार केलेल्या वाघाची कातडी विकत घेणाऱ्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील काहींना बिजापूर वनविभागाच्या अधिकार्यांनी वाघाच्या कातडीसह अटक केली.
सदर घटनेची तपास करीत असताना बिजापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यानी यात सहभागी असलेल्या 20 जणांना आत्तापर्यंत अटक केली असून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा तालुक्यातील 11 जणांचा यात समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. आमगाव व सालेकसा येथील आरोपींना 8 जुलै रोजी बिजापूर वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. वाघाची कातडी कुठून आणली याचा सविस्तर तपास करतांना पकडण्यात आलेल्या आरोपींनी महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्हा बॉर्डर वरून आणल्याचे सांगितले. त्यानुसार बिजापूर पोलिसांनी सालेकसा तालुक्यातील मुख्य आरोपी आणि आमगाव तालुक्यातील कातडी विकण्यास मदत करणाऱ्या आरोपींना अटक केल्याने जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ माजली होती.
जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प असून जिल्ह्याला लागूनच मध्यप्रदेश राज्यातील जंगलभागही आहे. याचा फायदा घेत वन्यप्राण्यांची तस्करी करणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असल्याचे या प्रकरणावरुन समोर आले आहे. सालेकसा जंगलातून एका वाघाची शिकार केली आणि ही कातडी नखे, हाडे आणि मिशीचे केस हे छत्तीसगड राज्यातील बीजापूर येथील सीआरपीएफचे सब इन्स्पेक्टर अमित झा आणि त्याच्या 20 सहकाऱ्यांना कातळी विकली. याबाबत विजापूर वन विभागाने कारवाई करत अमित झा यांच्यासह 20 जणांना या गुन्हामध्ये आरोपी करून त्यांना अटक केली. सविस्तर तपास केला असता ही वाघाची कातडी सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलातून वाघाची शिकार करून ही कातळी विकल्याचे समोर आले. यामध्ये मुख्य आरोपी शालिक मरकाम वय 55, कोसाटोला / मुरुपार, सुरज मरकाम वय 45 कोसाटोला / मुरुपार, जियाराम मरकाम, नवाटोला सालेकसा या तिघांनी वाघाला करंट लावून मारल्याचे कबूल केले.
तसेच घटनास्थळावरून वाघाच्या हाडाचे तुकडे मिळाल्याचे छत्तीसगड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचे नख आणि मिशीचे केस विक्री करणे असल्याचे आरोपींनी सांगितले. या तिघांना वाघाची कातडी विकण्यासाठी मदत करणाऱ्या आरोपींमध्ये गेंदलाल भोयर वय 55, लभानधारणी, तुकाराम बघेले वय 59, भाडीपार, अंगराज कटरे वय 67 दरबडा, वामन फुंडे वय 60, सिंधीटोला, या 4 आरोपींना सालेकसा तालुक्यातून अटक करण्यात आली. तर विक्रीमध्ये मदत करणारे आमगाव येथील शामराव शिवनकर 53 वर्ष, रेल्वेमध्ये नोकरी करणारे जितेंद्र पंडित, नालंदा बिहार सध्या मु. आमगाव, यादवराव पंधरे बोदरा जि. भंडारा, अशोक खोटेले वय 50, गुदमा गोंदिया अशा अकरा लोकांना बीजापूर येथील वन अधिकाऱ्यांनी अटक केली असून या घटनेच्या तपासादरम्यान बिजापूर (छत्तीसगड) वन विभागाने यामध्ये सहभागी एकुण २० जणांना अटक केली.
गोंदिया जिल्ह्यातील या घटनेनंतर संशयितांचे अटकसत्र सुरू होताच, चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग व पोलिस विभागा ने सुद्धा चौकशीला सुरुवात केली. वाघाच्या शिकारी संदर्भात अटकेतील आरोपींशी भ्रमण ध्वनीवर झालेल्या संवादावरून गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील ट्रॅक्टर चालक धर्मराव चापले याला अटक करण्यात आली आहे.
देशातील १३ व्याघ्र प्रकल्पांना सीबीआय कडून धोक्याचा इशारा देण्यात आला. यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेनेदेखील इशारा दिल्यानंतर चंद्रपूरचा मध्यचांदा वन विभाग सतर्क झाला आहे.
आंतरराज्यीय वाघाच्या शिकार प्रकरणी वन विभागाने पोलिस विभागाची मदत घेतली. छत्तीसगडच्या एसपींनी चंद्रपूरचे एसपी रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी ठाणेदार जीवन राजगुरु, पीएसआय धर्मराज पटले यांनी आरोपी धर्मराव चापले याला अटक केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here