वडाळा (तु) येथे शाश्वत वन उपज आधारित उल्का प्रक्रिया उद्योग केंद्राच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

0
281

चंद्रपूर :- जंगल जवळील गावातील लोकांच्या शाश्वत विकासासाठी अभिनव उपक्रम म्हणुन नाम फाऊंडेशन च्या विशेष सहकार्याने भद्रावती तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या वडाळा (तु.) येथे मंगळवार दिनांक १४ जुन २०२२ ला दुपारी ४.३० वाजता शाश्वत वन उपज आधारित उल्का प्रक्रिया उद्योग केंद्राच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
उल्का प्रक्रिया उद्योग केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण व उद्घाटन नाम फाउंडेशनचे संस्थापक व विश्वस्थ तथा सिने अभिनेते मा.मकरंदजी अनासपुरे मुंबई यांचे हस्ते होणार असून यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, नाम फाउंडेशनचे  चंद्रशेखर ललिता सदाशिवन (विश्वस्थ), डॉ. इंद्रजीत देशमुख (विश्वस्थ),  श्री संजय नाईक (विश्वस्थ),  श्री .मल्हार पाटेकर (कार्यक्रम व्यवस्थापक), .हरिष इथापे (विदर्भ समन्वयक) ,  गणेश थोरात (कार्यक्रम व्यवस्थापक) विशेषतः उपस्थित राहणार आहेत.
तरी होणा-या या कार्यक्रमाला उपस्थित राहुन सहभागी होण्याचे आव्हान पर्यावरण मित्रचे अध्यक्ष ॲड.विजय देठे, बायोकांसेप्ट पुणेचे पुर्वा जोशी, उल्का प्रकल्प संचालक माधव जिवतोडे, उल्का प्रकल्प व्यवस्थापक शंकर भरडे क्रांतीज्योती महिला बचत गट वडाळा तुकूम चे अध्यक्ष अनिता भरडे, सचिव पत्राबाई नन्नावरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here