गडचिरोली /आरमोरी :- शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज 13 मे 2022 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली .
सदर घटना ही आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावा जवळील घडली असून मृतकच महिलेचे नाव नलू बाबुराव जांगडे (वय ३५ रा.अरसोडा) असेआहे.
घरी पती आजारी असल्याने नलू आज सकाळी उन्हाळी पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेली असता शेतातील बांध्याच्या आड शिकारी करिता दडून बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला व जागेच ठार केला.
सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले त्यावेळी वाघ त्याच परिसरात होता. गावकऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले.या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी आपल्या टीम सोबत घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला.