चंद्रपूर :
दिनांक ०६ मे २०२१ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील कोर क्षेत्र कोळसा (बोटेझरी) हत्ती कॅम्प येथे वनविभागाचे मुख्य लेखापाल प्रमोद गौरकर याचा हत्ती (गजराज) याच्या हल्यात दुदैवी मृत्यु झाला. हि घटना आकस्मीत नसुन वनविभागाच्या वरीष्ठ अधिकारी ए.सी.एफ कुलकर्णी (कोर) याच्या निष्काळजीमुळे व लापरवाही मुळे घटना घडण्यात आली आहे.
सदर प्रकरणाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वरीष्ठ अधिकारी हे लपविण्याचा प्रयत्न करीत आहे.
सदर अपघातात मृत्यू झालेल्या प्रमोद गौरकर यांची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा व कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिव अमोल मेश्राम यांनी मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनातून केली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील कोर क्षेत्र असलेल्या बोटेझरी हत्ती कॅम्प येथे वनविभागाचे मुख्य लेखापाल कशासाठी गेले होते याचा खुलासा अद्याप झालेला नाही. तसेच विभागीय कार्यालयात कुठलाही लेखापाल हा फिल्डवर विभागीय कार्यालयाचे कामकाज सोडून गेला कसा यांची परवानगी त्यांनी घेतली होती काय ?
बोटेझरी परिसरात माणव वस्ती नाही किंवा कोणतेही डिर्पाटमेटल किवा कार्यालयीन ऑफीस नाही मग मुख्य लेखापाल ला अशा ठिकाणी जाण्याचा कारण ? असे बसेच प्रश्न उपस्थित होत असून लेखापाल प्रमोद गौरकर यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर उचित कारवाई करावी.
अशी मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा व कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिव अमोल मेश्राम यांनी केली आहे.
यावेळी निवेदनाप्रसंगी जिल्हा महासचिव अमोल मेश्राम, शहर प्रमुख महेंद्र ठाकूर, तालुका प्रमुख पप्पू यादव, पर्यावरण प्रेमी चंदन सपाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.