चंद्रपूर :
स्वाब नेचर केअर संस्था व तळोदी (बा.) वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पक्षी सप्ताह निमित्ताने व सलीम अली यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पक्षी निरीक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील गोविंदपुर नियतक्षेत्रात येणाऱ्या लावारी तलाव व सारंगड तलाव परिसरामध्ये आज 12 नोव्हेंबर 2022 पक्षी सप्ताह व सलीम अली यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पक्षी निरीक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम ‘स्वाब संस्था व वन विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.
यावेळेस 44 पक्षांची नोंद घेण्यात आली त्यात काही प्रवासी पक्षी कलहंस ( Greylag goose) तर काही स्थानिक पक्षांची नोंद घेण्यात आली.
यावेळेस लोक विद्यालय शाळा तळोदी बाळापूर येथील 23 विद्यार्थी व तीन वर्ग शिक्षक, स्वाब संस्थेचे सदस्य पदाधिकारी, सोबतच तळोदी परिसरातील पी. आर. टी. चे सदस्य व वन विभागाचे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास पक्षी अभ्यासक व डब्लू. पी. एस.आय. चे सदस्य रोशन धोत्रे, नागपूरचे पक्षीमित्र चिन्मय बांबुळे यांनी निरीक्षणाच्या दरम्यान नोंद झालेल्या पक्षांबद्दल भक्ष, घरटे ,आणि प्रवास याबद्दल सविस्तर माहिती दिली.
स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, यांनी निसर्ग चक्रामध्ये पक्षांचे सुद्धा महत्त्वाचे योगदान असून चिमणी असो की गरुड, घुबड असो की कावळा, सर्वांचा पर्यावरण संरक्षणात व संवर्धनात कसा महत्त्वाचा वाटा आहे याबद्दल मार्गदर्शन केले, तर तळोदीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिरिक्त कार्यभार असलेले महेश गायकवाड यांनी त्यांच्या आकारमानावरून त्यांची वर्गीकरण व नोंद कशी करायची याबद्दल सांगितले. तर लोक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक बांगरे सर यांनी विद्यार्थ्यांना व आपले मत मांडताना या निरीक्षणातून खूप काही सविस्तर शिकायला मिळाले असे सांगितले.
स्वाप संस्थेचे सचिव अनिल लोणबुले यांनी या पक्षी निरीक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमासाठी झालेल्या तळोदी बाळापुर येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच वन विभागाचे कर्मचारी पार्टीचे सदस्य व त्या संस्थेच्या सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.