सावरगाव येथे वन महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन व वृक्षारोपण ; तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत लोक विद्यालय शाळा येथे आयोजन

0
235

चंद्रपूर : तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र द्वारे, लोक विद्यालय शाळा सावरगाव येथे आज वन महोत्सव निमित्ताने पर्यावरण या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये पाचवी ते सातवी कक्षाच्या तीस विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर आठवी ते दहावी तीन वर्गाच्या तीस विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. व त्यानंतर लोक विद्यालय शाळा परिसरामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वृक्षमित्र संबोधुन पारितोषिक म्हणून फळझाडे देण्यात आले. व सोबतच प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले तसेच स्पर्धेतील सहभागी संपूर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यात चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम भुवन निकुरे, द्वितीय सानीया टेकाम, तर तृतीय पारितोषिक गायत्री निकुरे यांना मिळाली. तर प्रश्न मंजुषा परीक्षा मध्ये आदित्य आंबोरकर, द्वितीय जान्हवी बोरकर, सिध्दी बोरकर, हिला तृतीय पारितोषिक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सोनाली कडनोर वनपरिक्षेत्र अधिकारी, व कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.एम.कांमडी मुख्याध्यापक लोक विद्यालय सावरगाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व उत्तीर्ण व सहभागी संपूर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळेस या स्वाब संस्थेचे सदस्य, वन विभागाचे तळोधी वन परिक्षेत्रातील संपूर्ण कर्मचारी, लोक विद्यालय शाळेचे संपूर्ण शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात लोक विद्यालय शाळेच्या ढोके मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here