आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांत ३ बाघ (बछडे), १ अस्वल, व १ बिबट असे ५ मोठ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूने हळहळ.*

0
197

कुळे सावली स्मशानभूमीत युवा मादा बिबट मृतावस्थेत आढळली
यश कायरकर:
वन्यजीव प्रेमीं करिता काळा दिवस
आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांत वन्यजीव प्रेमींना दुखावनार्या दुर्दैवी घटनांत ३ बाघ (बछडे), १ अस्वल, व १ बिबट असे ५ मोठ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूने हळहळ. भंडारा जिल्ह्यातील गराडा/ बुज (पहिला) गावाजवळील उपसा सिंचनाच्या विहिरीत दोन महिने वयाच्या 2 मादा वाघाच्या बछड्यांचे मृतदेह आढळले. त्यानंतर गुळेगाव बिटात आईने सोडलेल्या वाघाच्या एक बछड्यांचे मृत्यु झाले. व लगेच त्यानंतर पवनी वनपरिक्षेत्रातील खापा क्षेत्रात कक्ष क्रमांक २८६ मध्ये गस्तीवर असलेल्या वनरक्षक फुरसुंगे यांना एक नर अस्वल मृतावस्थेत आढळला. आता त्या नंतर सायंकाळी ब्रम्हपुरी वनविभागाच्या आवळगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत हळदा बिटातील संरक्षीत वनात कक्ष क्रमांक ११७८ मध्ये कुळे सावली पासून १०० मिटर अंतरावर गावच्या स्मशानभूमीत एक मादा बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने . आजचा दिवस वन्यजीवांच्या करिता काळा दिवसच ऊजाळला.
सविस्तर, आज सायंकाळी एक मादा बिबट मृतावस्थेत आढळली. कुळे सावली येथील फिरायला बाहेर गेलेले इसमाला गावच्या स्मशानभूमीत आज सायंकाळी ५:३० वाजता दुर्गंधी मुळे एक अंदाजे ३ वर्षे वयाची युवा मादा बिबट मृतावस्थेत आढळून आली. ही मृत बिबट दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाच्या आवळगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत हळदा बिटातील, संरक्षीत वनक्षेत्र कक्ष११७८ मध्ये आहे.


घटनेची माहिती मिळताच लगेच घटनास्थळी दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एल.शाह मॅडम सोबतच मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी श्री विवेक भाऊ करंबेकर हे घटनास्थळी पोहोचले. मोक्का पंचनामा करून बिबट्या चा मृतदेह शवविच्छेदन करन्याकरीता ब्रम्हपुरी वनविभागाग ब्रम्हपुरी येथे नेण्यात येणार असल्याचे लक्षात आले. अजुनही कोनत्या प्रकाराचे म्रृत्युचे प्राथमिक कारण कळू शकले नाही. व मृत बिबट च्या शरिरावरील संपूर्ण अवयव शाबूत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here