विहिरीत आढळले वाघाचे दोन बछड्यांचे मृतदेह

0
197

भंडारा:
भंडारा पासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील गराडा/बूज(पहेला) गावा जवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या विहिरीत दिनांक 11 मई 2021 रोजी मंगळवारी सकाळच्या समारास वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. तसेच त्याच दिवशी भंडारा जवळील बेला येथे एका वाघाचे पगमार्क दिसून आले होते. या वाघाच्या बछड्याचा काही संबंध तर नही या दिशेने वनविभागाची टीम तपास करत आहे.

पोलीस प्रशिक्षणची तयारी करणारे तरुण नेहमी प्रमाणे सकाळी धावण्यास गेले असता त्यांचे लक्ष वाघाचे दोन बछडे गराडा/बूज (पहेला) गावाजवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या विहिरीत मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकारी याची माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वाजूरकर आणि कर्मचारी सोबत घटनास्थळी पोहोचले. मृत बछड्याजवळ वाघिणीच्या पगमार्क आढळून आले. वनविभाग वाघिणीचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here