
चंद्रपूर :
ताडोबा मध्ये स्थानिकांना रोजगार देण्याकडे ताडोबा प्रशासन पाठ फिरवत असून मागे ग्राम सभेने घेतलेला निर्णय तसेच मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोतरे यांनी सुद्धा हा मुद्दा 2019 मध्ये LAC च्या बैठकीत उपस्थित केला परंतु या बाबतीत कुठलीच सकारात्मक पाऊले उचलल्या गेली नाही.
ताडोबाच्या मौलिक वन आणि वन्यजीव संपदेची संवर्धन तसेच मदत करण्याचे काम हे वेळोवेळी स्थानिकच करतात. परंतु अशा प्रकारे उपेक्षा होत असेल तर आम्ही काय करावे? असा प्रश्न आता उभा ठाकला आहे.
ताडोबा मध्ये स्थानिक जिप्सी धारकांना वाव नाही.बाहेरची मंडळी, शासकीय कर्मचारी गावात एक जागेचा टुकता विकत घेऊन स्थानिक आहो असे दाखवतात व आपल्या नावाने जिप्सी व्यवसाय करतात. हा प्रश्न मोहर्ली गट ग्रामपंचायत ने 2018 रोजी ग्रामसभेच्या ठरावानुसार स्थानिकांना प्राधान्य देण्याचे प्रस्तावात सांगितले होते. परंतु ताडोबा प्रशासन सध्या अशी तरतूद नसल्याचे कारण सांगून बगल देत आहे.. नियमानुसार रिसोर्ट धारकांना सर्वसाधारण एक जिप्सीची परवानगी असली तरी प्रत्यक्षात मात्र रिसोर्ट धारकाच्या एक पेक्षा अनेक जिप्सी व्यवसाय करीत आहे ज्याचा प्रत्यक्षात परिणाम स्थानिक जिप्सी धारकांचा रोजगारावर झाला आहे. यामुळे दिवसें दिवस स्थानिक जिप्सी धारकांना मध्ये प्रचंड असंतोष वाढत असून येणारा काळात संपूर्ण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक जिप्सी धारक संघटित होऊन ताडोबा प्रशासना विरुद्ध आंदोलन करण्याचा विचार करीत आहे.
सध्या ताडोबा मध्ये एकट्या मोहर्ली गेट वरून 57 जिप्सी चालत आहेत. त्यामध्ये बाहेरील 20 वाहनांच्या वर समावेश आहे. या ऐवजी स्थानिकांना दहा जिप्सीची जरी परवानगी दिली तरी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. याशिवाय स्थानिक ताडोबाच्या वन आणि वन्यजीव रक्षणासाठी सुद्धा आपले योगदान देऊ शकतील. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. ताडोबा प्रशासनाने योग्य नियोजन केले तर इतरही अनेक रोजगारांची संधी उपलब्ध होऊ शकतील, अशी आशा सुद्धा आहे.
