ताडोबा येथील मोहर्ली गावात मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

0
219

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):

मौजा मोहर्ली येथे दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12:00 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम लायन्स आय सेंटर, सेवाग्राम; लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली; महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर; आणि वन विभाग चंद्रपूर क्षेत्र** यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

या शिबिरामध्ये मोहर्ली वनपरिक्षेत्रातील देवाडा, अडेगाव, आगरझरी, भामडेळी, सितारामपेठ, मुधोली, टेकाडी, किटाळी आणि भटाळी येथील 305 ग्रामस्थांनी सहभागी होऊन नोंदणी केली. शिबिरादरम्यान, 23 रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी सेवाग्राम (वर्धा) येथे पाठविण्यात आले.

 

12 जानेवारी 2025 रोजी सेवाग्राम येथे या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना निवास, भोजन आणि औषधे पूर्णपणे मोफत दिली जाणार आहेत. तसेच,मोहर्ली ते सेवाग्राम आणि परत येण्यासाठी मोफत बससेवेची सोय करण्यात आली आहे.

हे शिबिर ग्रामीणांसाठी अत्यंत उपयुक्त आणि कौतुकास्पद उपक्रम असून, डोळ्यांची काळजी आणि आरोग्याला प्राधान्य देते.

या उपक्रमामध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे डॉ. अजय शुक्ला, डॉ. महादेव चिंचोडे, अजय वैरागडे, पंकज शर्मा, हसन अली अकबर अली, वीर त्रिशूल बंब, वीर प्रसन्न बोयरा, श्री. संतोष थिपे, श्री. संजय जुमडे, ताहेर हसन अली बोहरा, संजू भाऊ बुराण, ताडोबा व्हॅली रिसॉर्ट मालक संजय ढिमोले आणि वनविभागाचे कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.

या प्रसंगी मोहर्ली बफर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.संतोष थिपे म्हणाले की, – “आजचे भव्य मोफत मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर चे संस्थापक अध्यक्ष स्व. वीर नरपतचंद भंडारी यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या काही चुकांमुळे होणारे दृष्टीदोष दूर करणे असून, त्यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल चंद्रपूर आणि लायन्स क्लब, चंद्रपूर महाकाली पुढे येऊन मदत करते. मी व मोहर्ली ग्रामस्थ त्यांचे मनापासून शुभेच्छा व आभार व्यक्त करतो.

ते पुढे म्हणाले की, ते मागील पाच ते दहा वर्षांपासून रोटरी क्लब चे सदस्य आहेत आणि गेल्या तीन वर्षांपासून बोरली परिसरामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून विशेषतः महिलांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करीत आहेत.

याशिवाय, मागील तीन वर्षांपासून मोहर्ली गावात एक गाव एक गणपती या उपक्रमांतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात आला.

या उत्सवात दहा गावांतील ग्रामस्थ 10 दिवस सहभागी झाले आणि त्या निमित्ताने समाजप्रबोधनाचे कार्यक्रम देखील घेतले गेले.

तसेच, त्यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि या माध्यमातून समाजप्रबोधनाचे उपक्रम राबविले जात आहेत आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे कार्यक्रमात सहकार्य करेल असे ते म्हणाले.”

लॉन्स क्लब चंद्रपूर महाकालीचे अध्यक्ष अजय वैरागडे यांनी बोलताना सांगितले की, “लॉयन्स इंटरनॅशनल 210 देशांमध्ये कार्यरत आहे. त्याच अंतर्गत लॉयन्स क्लब चंद्रपूर महाकाली गेल्या 14 वर्षांपासून मोतीबिंदू आणि डोळे तपासणीचे शिबिरे आयोजित करत आहे. आमच्या चंद्रपूर फॅमिलीने आतापर्यंत एक लाख 25 हजारांहून अधिक मोतीबिंदू ऑपरेशन केले असून, दरवर्षी दोन ते तीन हजार ऑपरेशन केले जातात.”

ते पुढे म्हणाले की, “या उपक्रमात महावीर इंटरनॅशनल चंद्रपूरचे नेहमीच सहकार्य लाभत असते. आम्ही दोन्ही संस्थांनी एकत्रितपणे समाजासाठी कार्य करत आहोत.”

लॉयन्स क्लब चंद्रपूर महाकालीचा हा उपक्रम दृष्टीदोष असलेल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असून, शिबिरांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here