राष्ट्रीय वन शहीद दिवस

0
246

वनांचे ,वन्यजिवांचे पर्यायाने पर्यावरणाचे रक्षणार्थ अनेक वनअधिकारी कर्मचारी वनमजूर यांनी आपल्या प्राणाच्या आहूत्या दिल्या व वनांचे , वन्यजिवांचे संरक्षण केलेत.

आजही खनन माफिया ,शिकारी, अतिक्रमण माफिया ,जंगल माफिया यांचे कडून वनकर्मचारी यांचेवर दिवसेंदिवस हल्ले होणे सुरूच आहे.

वनांचे संरक्षणार्थ सर्वोच्च बलीदान
राजस्थान जोधपूर येथील खेजडी गावात झाले.
इ.स. १७३२ मध्ये खेजडी गावातील शमीची ( दसरा सोना) झाडे कापण्याचे आदेश त्या वेळेस चे राजा अभयसींग जोधपुर यांनी आपल्या सैनिकांना दिले होते. या झाडे कटाईच्या आदेशाचा खेजडी येथिल ग्रामीनांनी अमरूता देवी यांचे नेतृवात एकत्रित येऊन विरोध केला. यामुळे राज्याचे सैनिक झाडे न कापता परत गेलेत व राजा अभयसींग जोधपुर यांना सैनिकांनी घडलेली घटना सांगितली .तेव्हा अभयसींग राज्याने सैनिकांना पुन्हा शमी ची झाडे कापण्याचे आदेश दिलेत व जो या आदेशाचा विरोध करेल त्यांना तेथेच मारून टाका हे स्पष्टपणे सांगितले.
पुन्हा राज्याचे सैनिक खेजडी गावात शमीची झाडे कापण्याकरिता आलेत व अमरूता देवी यांचे नेतृवात एकत्रित जमा झालेल्या गावकऱ्यांना राज्याचे आदेश सांगितले व झाडे कापण्याला सुरुवात केली.
खेजडी येथिल गावकरी यांनी अमरूता देवी या़च्या नेत्रूत्वात सैनिकांना झाडे कापण्यास पुन्हा विरोध केला व सैनिक झाडे कापत असलेल्या प्रत्येक झाडाला विळखा घातला, आलींगण केलेत. सैनिकांनी मौक्यावर कोणाची एक न ऐकता झाडाला विळखा देणाऱ्या एकेकाला तलवारीने कापून काढले. असे एकूण ३६३स्त्रि पुरूष वनसंरक्षण करतांना शाहिद झाले.
या घटनेला भारत सरकारने ७/५/२०१३ ला मान्यता दिली व ११ सप्तेंबर हि तारिख वन शहिद दिवस  म्हणून घोषीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here