सावली : सावली तालुक्यातील हिरापूर येथे एका शेतमजुरांवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटनेत मृतकाचे नाव भक्त दास श्रीरंग झरकर वय 35 वर्ष असे आहे.
प्राप्त माहितीनुसार भक्तदास हा रोजी ने सुरेश भिसेच्या शेतात काम करण्यास गेले असता शेतातील काम पूर्ण झाल्यानंतर परत येताना बैलाला वाटेत धूत असतांना अचानक वाघाने येऊन हल्ला करून ठार केले. परिसरात वाघ असल्याचे चाहूल आधीच बैलाला लागल्याने वाघ बघून चवताळले व सोबत असलेले दोन शेतमजूर झुडपात लपून बसले. भक्तदास समोर दिसल्याने त्याच्यावर वाघाने हल्ला केला व फळकळत नेले.
सोबत असलेल्या शेतमजुरांनी जोरजोरात आरडाओरड केली असता वाघ भक्तदासला सोडून निघून गेला. मात्र तोपर्यंत भक्तदास चा जीव गेला होता.
मृतकाचा परिवारात एक मुलगा एक मुलगी व पत्नी आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळतात सावली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मौका पंचनामा केला व पुढील तपास करीत आहे.