
गोंदिया : –एका रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्यासने वन विभागात खळबळ. पूर्ण विकसित ‘एल टी -१’ नामक वाघ
दि. 10 जून 2022 रोजी रात्रीच्या सुमारास एका वेगवान रेल्वेच्या धडकेत अर्जुनी मोरगाव, वन परिक्षेत्रातील, कोरंबी बिट, वडेगाव वनक्षेत्रा मध्ये सकाळच्या सुमारास रेल्वे कर्मचारी रुट ने गस्ती दरम्यान वाघ मृत अवस्थेत आढळून आले.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वन कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले व वनपरिक्षेत्र अधिकारी खोब्रागडे, यांच्या मार्गदर्शनात, क्षेत्र सहाय्यक डब्लु.एल.वेलतूरे, वनरक्षक आस्वले, प्रियंका राऊत पुढील तपास करीत आहे.
बातमी प्रकाशित होई पर्यंत शवविच्छेदन झालेले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई सुरू आहे.
