जनाला येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार : त्याच परिसरातील वाघाने जखमी केलेली महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू

0
148

मूल :

आज दिनांक 11 मई 2021 रोजी चिरोली बिटातील कक्ष क्र. 718, मुल उपवनक्षेत्र , चिचपल्ली वनपरिक्षेत्र येथे कीर्तिराम देवराव कुलमेथे वय 35 वर्ष राहणार जनाला याला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघड़किस आली.त्याचा सोबत असलेल्या इसमाने कीर्तीरामला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु वाघ त्याच्या अंगावर धावून आल्याने तो तेथून पळून गेला व लगेच फ़ोन करून गावकऱ्यांना माहिती दिली.
दोन दिवसांपूर्वीच जनाला येथे वनिता वसंत गेडाम महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती जखमी झाली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना ती आज मरण पावल्याची दुःखद घटना घडली.सतत दोन घटना मुळे गावात भीतीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here