नागझिरा येथिल दुर्घटनाची कठोर कार्यवाहीची मागणी – मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मुकुंद दुर्वे व शाहिद खान

0
632

नागझिरा अभयारण्यातील पिटेझरी वनपरिक्षेत्रात भीषण आगीत होरपळून 3 वनमजुरांचा दुःखद मृत्यू व दोन गंभीर जखमी बाबत मानद वन्यजीव रक्षकांनी वनविभागाला कारवाही बद्दल संयुक्त पत्र सादर केले.
दिनांक 8 एप्रिल गुरुवार रोजी दुपारला पिटेझरी वन परिक्षेत्रात कक्ष क्र. 97,98,99,100 येथे भीषण आग लागली असता वन्यजीव विभागाचे कर्मचारी, वनमजुर व हंगामी वनमजूर आग विझविण्याचे कार्य जोमाने करत असतानी दुर्दैवी दुर्घटनेत तीन वनमजूर नामे रेखचंद गोपीचंद राणे, राकेश युवराज मडावी, सचिन अशोक श्रीरंगे यांचा जागीच आगे होरपळून दुःखद मृत्यू झाला तसेच दोन वनमजुर विजय मरस्कोल्हे व राजू सयाम जळून जखमी झालेत सध्या या दोघांचा नागपूर येथे उपचार सुरू आहे.
पूर्व विदर्भात प्रथमता एवढी मोठी दुर्घटना घडली
सदर घटना ही वन व वन्यजीव अभयारण्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पडताना घडली आहे.
आग विझवतांना  आगीला नियंत्रित करण्यासाठी वन मजूर पाठीवर ब्लोवर मशीन घेऊन पुढे होते ही आग उंच पहाडावर लागल्याने मोठ्या अग्निज्वाला चा जवळ जाऊन आग विझवणे आवश्यक असल्याने हे दुर्दैवी लोक दुर्गम क्षेत्रात चढून वर गेले आपले कर्तव्याचे करीत असताना दुर्दैवाने त्यांच्या मागे लागलेल्या आगीत अडकून  पडलेत
शरीराच्या पाठीला बांधलेले भारी करकम ब्लोअर मशीन तात्काळ दूर न करता आल्यामुळे ही मशीन पेट्रोल/ डीजल इंधनावर चालत असल्यामुळे त्या इंधनाचा ब्लास्ट होऊन स्थिती अधिक गंभीर झाली यात पाठीवर ब्लोअर मशीन लादून असलेले तिन्ही वनमजूर जागीच होरपडून पेटलेत व इतर दोन गंभीर जखमी झाले..
दुर्देवी घटना मनाला सुन्न करणारी असून दुर्घटनेनंतर या परिसरात घटनेची सखोल चौकशी व्हावी ही लोकांची मागणी आहे. घटने नंतर मानद वन्यजीव रक्षक यांच्याशी गावकरी व जमीन स्तरावर काम करणाऱ्या वन मजुरांनी त्यांच्या सुरक्षेचा संबंधित प्रश्न उपस्थित केलेत

  • वनसंपत्तीचे रक्षण करताना वीर मरण आलेल्या तीन शहीद वनमजूराना यांना वन शहीद म्हणून घोषित करावे.
  • घटनेची उच्चस्तरीय पारदर्शक चौकशी व्हावी व जे घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
  • उन्हाळ्यात अग्नि रोकथाम हंगामा करिता नियुक्त करताना तंत्रशुद्ध अग्नि रोकथाम प्रशिक्षण दिल्या खेरीज कोणतेही या कार्याकरिता नियुक्ती करण्यात येऊ नये.
  • जंगलात अग्नी फायर वॉचरांना अग्निप्रतिबंधक गणवेष, इतर आवश्यक साधन व प्रथमोपचार किट अनिवार्य करावे व उपलब्ध करून द्यावे.
  • हंगामी वनमजुरांना नियुक्तीनुसार त्यांना फक्त मॅनडेज पगार दिला जातो पण या व्यतिरिक्त कोणतीच सुविधा पुरवली जात नाही घनदाट जंगलात काम करताना या लोकांना खूप नैसर्गिक धोक्यापासून सामना करावा लागतो साधे जोडे नसल्यामुळे हे लोक चकली वर काम करतात यांना जोडी आवश्यक ड्रेस व इतर फील्ड साहित्य द्यावे सर्वांचे सामूहिक विमा आवश्यक करावे यासाठी आर्थिक प्रयोजन वन विभागाने करावे.
  • अग्नि प्रतिबंधात्मक लागणारे साहित्य जसे ब्लोवर मशीन यांची गुणवत्ता कमकुवत असल्याचे आरोप जमिनीवर काम कर्मचाऱ्यांची आहे तरी याची चौकशी व्हावी.
  • अग्नि रोकथाम सीजन ची पूर्व तयारी असूनही जसे, वाचन नियुक्त करुन टॉवर वरुन सनियंत्रण (मॉनिटरिंग) करून, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या मार्फत जनजागृती करून, फायर लाईनचे काम करून, आवश्यक साहित्य व सामग्री खरेदी करून, एवढी कार्य व तयारी अपेक्षित असून थेट अभयारण्याच्या आत आग कशी लागते हे मोठ्या गूढ़ प्रश्नांच्या सखोल चौकशी होणे अपेक्षित व अनिवार्य आहे.
  • वन्यजीव अभयारण्य सभोवताली असलेले तेंदुपत्ता संकलन केंद्र जसे,कोसमतोंडी केंद्र, पितेझरी केंद्र यांच्या लिलाव मध्ये ज्या कंपनीने /कंत्राटदाराने निविदा जिंकली आहे त्याची चौकशी करून घ्यावी आमच्या निर्देश देण्यात आले आहे की होळी सणा दरम्यान तेंदूपत्ता कंत्राटदाराचे लवकर जंगलामध्ये जाऊन आधी लावतात जेणेकरून तेंदूपत्ता पीक चांगली यावी या सार्थ पोटी जंगलातील अमुल्य संपूर्ण जैविक विविधता नष्ट करतात याची जाणीव वन कर्मचाऱ्यांना असते पण वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत कठोर कारवाई व निर्णय घेत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणे अशक्य आहे सदर घटनेसाठी कंत्राटदार/ तेंदुपत्ता कंपनी दोशी असू शकते तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करून कंपनीचे कंत्राट रद्द करावे व शासनाकडे जमा असलेली अमानत व स्वामित्व (रॉयल्टी) रक्कम जप्त करून संबंधित ग्रामविकास करिता उपयोग करून घ्यावा.
  • अभ्यारण्यालगतच्या 5 किलोमीटर अंतरावर आतील सर्व तेंदूपत्ता फळ्या पूर्णता रद्द करून बंद करण्यात याव्यात

तरी घटनेच्या मुळाशी जाऊन शोध लावणे आवश्यक आहे भविष्यात अशा मानवनिर्मित घटना घडू नये याकरिता वन विभागाने कठोर पावले उचलावी व निर्णय घ्यावे म्हणून मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मुकुंद दुर्वे व शाहिद खान यांनी वनविभागाकडे संयुक्त पत्र सादर केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here