नागभीड तालुक्यातील पानोळी ते बाळापूर मार्गाने कोडंगाव परत येत असताना दुचाकी वाहनावर अचानक वाघाने हल्ला केल्याची घटना दि. 10 फरवरी 2022 बुधवारी रोज दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली.
सदर प्रकरणात दुचाकी वाहन चालकाचे नाव सुरज रंधये वय 28 वर्ष असून तो आपल्या वहिनीला पानोळी येथे सोडण्यास गेला होता परत येतांना बाळापूर मार्ग म्हसलीला कच्चा रोड असल्याने दुचाकी वाहन हळू चालवित असतांना अचानक वाघाने झडप घेतली असता दुचाकीचे मागील शिटच्या भागावर पडल्याने शिट फाटली. वाघाचा हल्ल्याने दुचाकी वाहन घेऊन चालक खाली पडला. त्यावेळेस वाघ जवळ थांबलेला होता. दुचाकी पडली तेव्हा सुरू होती सुरज ने हिम्मत करून दुचाकीवर बसून तो कोटगावला आला.
घरी आल्यास त्याला चक्कर आली. तो फार घाबरलेला होता शरीर थरथर कापत होता. काही वेळा नंतर तो उठून बसला व त्याच्या सोबत घडलेले सर्व प्रकरण त्यांनी घरी सांगितले.
सदर घटनेत वाहन घेऊन पडल्याने सुरजच्या पायाला मार लागले आहे. मात्र नशीबाने साथ दिल्यामुळे त्याचे प्राण वाचले.