
मूल :- मूल तालुक्यातील भाटूणीं गट ग्रामपंचायतीत पडझरी येथील एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दि. १० जून २०२२ रोजी दुपारी ०१ वाजताच्या सुमारास उघडकीस आले असून मृतकाचे नाव प्रमोद झुंगाची मोहलें वय 42 वर्ष आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वन विभागाची टीम घटना स्थळी दाखल झाली व मौका पंचनामा केला.
नेहमी प्रमाणे पडझरी जंगल परिसरात गुरे चरण्यास गेले असता अचानक वाघाने हल्ला करून शेतकऱ्याला जागीच ठार केले.
सदर घटना बफर क्षेत्रातील असून या परिसरात वाघाचे हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
