गोंडपीपरी:
आज दिनांक 10 मे रोज सॊमवारला सकाळी सातच्या सुमारास गोंडपीपरी तालुक्यातील हिवरा येथील रामदास पाल गावालगत शेतशिवारात शौचास गेले असता जवळच झुडपात दडून बसलेला रानडुकराने अचानक रामदास पाल यांच्यावर हल्ला केला.
सदर हल्ल्यात रामदासच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच वेळेच आरडावओरड केल्याने गावातील नागरिक धाऊन आले लोकांची गर्दीमुळे रानडूकराने तेथून पड काढला. जख्मी रामदास पाल ला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयबगोंडपीपरी येथे नेण्यात आले.
या घटने मुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.