गडचिरोली :
गडचिरोली वनविभागातील वनपरिक्षेत्रात गोगाव – महादवाडी गावालगत वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना आज 10 मई सोमवार सकाळी 8 वाजताच्या समारास घडली. कल्पना दिलीप चुधरी वय (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे.
गडचिरोली वनपरिक्षेत्रातील गोगाव नियतक्षेत्रात कल्पना दिलीप चूधरी (३५) हे तेंदूपत्ता संकलन च्या काम चालू असताना, त्यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या नरडीचा घोट घेतला आजू बाजूच्या लोकांनी आरडा ओरड केला असतांना वाघ जंगलात पसार झाला, माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांना शेतात तसेच गावाला लागून असलेल्या जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत.
गडचिरोली चंद्रपुर नंतर मनुष्य व वाघाच्या संघर्षाचे आकर्षण केंद्र म्हणून जलद ओळखले जाणार आहे.
दिनांक 07 मई रोजी शुक्रवारी गडचिरोली येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील वाघाच्या हल्ल्यातील मानवी बळींचा आकडा सहा पर्यंत पोहचला आहे.
सुमारे पाच वर्षापूर्वी अवघ्या एक-दोन क्षणिक वाघांमधून जिल्ह्यात वडसा, गडचिरोली आणि आलापल्ली या तीन विभागात कमीतकमी २२ वाघ आहेत.गेल्या आठवड्यात गडचिरोली शहरातील आणखी एक महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. जिल्ह्यात पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत वाघांची संख्या शून्य ते २२ पर्यंत वाढली आहे.
सदर घटनेसह राज्यात वाघांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या विदर्भात 38 च्या वर गेली आहे,