भंडारा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ जखमी

0
337

भंडारा : भंडारा वनपरिक्षेत्रातील शहापूर बीट मधील मौजा कवडसी (झिरी रोड) येथील एका अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ जखमी अवस्थेत असल्याची माहिती दि. 8 मार्च 2022 रोजी वन्यजीव प्रेमी संदीप कालबांधे यांनी भ्रमण ध्वनी वरून दिली असता वनविभागाचे बचाव दल भंडारा घटना स्थळी पोहोचून जखमी चितळाला रेस्क्यू करण्यात आले व त्याला शासकीय वाहनाने जिल्हा पशुचिकित्सालय भंडारा येथे रेफर करण्यात आले.
जखमी चितळाचा प्राथमिक उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील परिसरात ठेवण्यात आले.

सदर प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांच्या मार्गदर्शनात अनिल शेळके वाहन चालक, एन.जी. श्रीरामे नरेंद्र कोडवते वनमजुर यांनी सदर जखमी चितळाला दि. 10 मार्च 2022 रोजी सकाळी 6.00 वाजताच्या सुमारास TTC नागपूर येथे सुखरूप पोहचविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here