यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी): ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रामध्ये सायगाव परिसरात व ब्रह्मपुरीच्या आसपास झालेल्या मनुष्यवधाच्या कारणीभूत चारही घटने करीता दिनांक 28/06/2022, 16/08/2022, 17/08/2022 व दि. 04/11/2022 रोजी असलेल्या वाघाच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीमध्ये कॅमेरा ट्रॅप छायाचित्रावरून SAM-II या नर वाघाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय, सदर वाघाचा शेतशिवार परिसरात नियमित वावर असल्याने व मानवी जीवास धोका कायम असल्याने SAM-II वाघास (नर) जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू होती. त्याअनुषंगाने दिनांक 08/11/2022 रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी उपक्षेत्र / सायगाटा नियतक्षेत्रामध्ये (कक्ष क्र. 118) सायंकाळी 7.06 वाजताच्या सुमारास डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर तथा प्रमुख RAT व श्री अजय मराठे शूटर, ART सदस्य यांनी SAM-I (नर) याला डार्ट केले व सदर बाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्यास त्यांचे चमुचे सहाय्याने पिंज-यात जेरबंद करण्यात आले.
सदर घटनेची कार्यवाही दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली एम. मी. चोपडे सहायक वनसंरक्षक (प्रादेव वन्य) ब्रम्हपुरी, एम. बी. गायकवाड, वनक्षेत्रपाल (प्रा) उत्तर ब्रम्हपुरी, आर. श्री. क्षेत्रपा (प्र) दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी तसेच ना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. चंद्रपूरचे सदस्य बी. आर. दांडेकर, ए. एन. मोहुल, एस. पी. नशावरे, ए. डी. तिखट, ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर, दिपेश टॅगुणकर, र रोदय, राकेश आहुजा फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी यांचे उपस्थितीत पार पडली.
जेरबंद करण्यात आलेल्या SAM-II याच (नर) मे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून सदर वाघाची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्याला ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.