( स्वाब सदस्यांनी पंधरवड्यात ६ अजगरांसह ४५ इतर सापांचे प्राण वाचविले)
तळोधी बा.;
घोडाझरी अभयारण्य परिसरातील सुरक्षित ठिकाणी दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजी २ अजगर व २ नागांना सोडून स्वाबच्या सर्पमित्रांनी जीवदान दिले.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तलाव पूर्णपणे भरून ओवर फ्लो होऊन वाहू लागतात त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला तलाव परिसरातील मच्छीमार तलावात सोडलेल्या मास्यांचे बीज आणि मोठी मसे सांडव्यातून वाहून जाऊ नये म्हणून तलावाच्या सांडव्यावर (ओव्हर फ्लो) ला जाळी लावून ठेवत असतात. मात्र तलाव भरून पाणी वाहताना या जाळ्यांमध्ये मास्यांसोबतच साप सुद्धा मोठ्या प्रमाणात अडकलेले असतात. तसेच पावसाळ्यात बिळात पाणी घुसल्यामुळे व वाळलेली जागा शोधण्यामध्ये घर परिसरामध्ये सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात साप मोठ्या प्रमाणात गावात, घरात प्रवेश करतात व लोकांच्या निदर्शनास येतात त्यामुळे साप निदर्शनास येताच लोक परिसरातील सर्पमित्रांना बोलवितात.
तळोधी बाळापुर परिसरातील पर्यावरणवादी ‘स्वाब’ नेचर केअरचे सदस्य व सर्पमित्र या परिसरात संकटात सापडलेल्या सापांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान देण्याचे काम करत असतात . यावर्षी पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी साचलेला आहे आणि परिसरातील संपूर्ण तलाव हे ओसंबळून भरून वाहत आहेत . त्यामुळे यावर्षी साप गावात घरात येण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. यामुळे तळोदी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी मच्छीमाराच्या जाळ्यात अडकलेल्या अजगर सापांना व परिसरातील गावात घरात निदर्शनास येणाऱ्या इतर विषारी, बिनविषारी सापांना पकडून त्यांना नजीकच्या संरक्षित घोडाझरी अभयारण्यात किंवा इतरत्र जंगल परिसरात सोडण्याचे काम ‘स्वाब’ संस्थेचे सदस्य सातत्याने करीत आहेत. यातच मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या दोन अजगरांना व नाग सापांना घोडाझरी अभयारण्य परिसरात सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले.
यासोबतच या पंधरवड्यात परिसरात पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलेल्या अजगरांची संख्या ही ६ (सहा) असून ४५(पंचेचाळीस) नाग, घोणस, मण्यार, इत्यादी सापांना सुद्धा सोडण्यात आले.
दोन अजगर व दोन नाग साप सोडताना ‘स्वाब’ संस्थेचे सर्पमित्र यश कायरकर, महेश बोरकर व सदस्य गोपाल कुंबले, वेदप्रकाश मेश्राम, हितेश मुंगमोडे, , प्रशांत सहारे,सचिन रामटेके, हे होते तर वन विभागाचे नागभीड बीटाचे वनरक्षक सी.एस. कुथे , घोडाझरी चे वनरक्षक ए. एच.लटपटे, तर तळोधी बा.चे वनरक्षक एस. बी. पेंदाम हे उपस्थित होते.