
चंद्रपूर वनविभागांतर्गत सावली परिक्षेत्रातील नियतक्षेत्र चकपिंजरी मौजा बोथली येथील शेतशिवारात आज दिनांक 9 एप्रिल रोजी वनरक्षक व्ही. जी. चौधरी, चकपिंजरी गस्त घालत असताना बोथली शिवे मधून जाणार्या नाल्याच्या जवळ गट क्रमांक 211 मध्ये नर बिबट मृत अवस्थेत आढळला. याची माहिती लगेच वरिष्ठांना देण्यात आली घटनेची मिळताच सहाय्यक वनरक्षक एस एल लखमावाई , वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, क्षेत्र सहाय्यक सावली व जांभुळे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती मुल, डॉ. रविकांत खोबरागडे, डॉ. कुंदन पोडचलदार पशुवैद्यकीय अधिकारी,TTC चंद्रपूर, मुकेश भांदककर,अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी व उमेश सिंग तेजसिंग झिरे, WPSI सदस्य मुल, यांनी घटना स्थळी पोहचुन मृत बिबट्याची पाहणी केली असता मृत बिबट नर असून त्याचे वय अंदाजे 8 वर्ष असल्याचे दिसून आले.
सदर बिबट्याचे नखे, मिशा, दांत या सर्व साबुत होते
मृत बिबट्याचे शवविच्छेदन दरम्यान शरीर कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही असे पशुधन विकास अधिकारी यांच्या चमूने सांगितले
