
वर्धा: कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील शेतकरी शेतशिवारात जनावरांसाठी गवत आणण्यास गेले असता वाघाचा हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज दि. 9 मार्च 2022 रोजी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटनेत मृतकाचे नाव लक्ष्मण महादेव उईके वय 30 वर्ष असून राहणार कन्नमवारग्राम येथील आहे.
लक्ष्मण उईके जनावरासाठी आपल्या शेतात गवत आणण्यास गेले असता अचानक वाघाने मागून येऊन हल्ला केला व शेतकरी लक्ष्मण जागीच ठार झाला.
शेतात गेलेला लक्ष्मण बराच वेळ निघून गेला तरी घरी परत न आल्याने त्याची पत्नी त्याच्या शोधात शेतात गेली तेव्हा लक्ष्मण गवाच्या पिकात मृतावस्थेत दिसून आल्याने सदर घटना उघडकीस आली.
मृतक लक्ष्मण हा विवाहित असून त्याला दोन लहान मुल आहेत.
सदर घटनेची माहिती कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली . वनविभागाला माहिती मिळताच संबंधित अधिकारी आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल होऊन मौका पंचनामा करण्यात आला. पुढील तपास कारंजा पोलिस करीत आहे.
