
9 मार्च पर्यंत आरोपी वन कोठडीत.
शिकारीसाठी वापरण्यात आलेले सापळा व लोखंडी स्प्रिंग इत्यादी साहित्य जप्त.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध अंतर्गत येत असलेला बोट टेकडी वनपरिक्षेत्रात मोराची शिकार दि. 6 मार्च 2022 रोजी रविवारला उघडकीस आली.
तपास दरम्यान दि. 6 मार्च 2022 रोजी सकाळच्या सुमारास 5 आरोपींना मुसक्या आवळ्यात वनविभागाने ताब्यात घेतले. यात चिंतामण भोगारे वय 65 वर्ष, मेहतलाल भोगारे वय 25 वर्ष, दौलत सलामे वय 45 वर्ष, इंदल सलामे वय 47 वर्ष हे सर्व येरंडी दरै येथील रहिवासी आहेत तर संकेश्वर मडावी वय 40 वर्ष हा परसटोला येथील रहिवासी आहेत.
सदर आरोपींना न्यायालयाने 9 मार्च पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सूरतोलीचे बीट वनरक्षक धनस्कर जंगलात गस्त करत असताना 3 इसम संशयास्पद वावरत असतांना आढळतात त्यांची तपास करण्यात आली.
तपास दरम्यान एका पिशवीत गळा कापलेला मोर मृतावस्थेत मिळाला व वाघ व बिबट्या या शिकारीसाठी वापरण्यात येणारे एक स्प्रिंग सुद्धा मिळाले.
वनपरिक्षेत्र कार्यालय नवेगावबांध येथे पुढील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले. तपास दरम्यान आरोपी ने लोखंडी स्प्रिंग व सापळा दौलत सलामे यांच्या येरंडी दरै येथून आणले असल्याचे कबुली दिली व इतियाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या एका नाल्यात मोराची शिकार केले असल्याची कबुली दिली.
सदर आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगावबांध वनपरिक्षेत्र अधिकारी रोशन दोनोडे हे पुढील तपास करीत आहेत.
