
( पेंडाल लावून वृक्ष लागवड व वृक्ष पुरवठ्याबद्दल मार्गदर्शन, तर तळोधी येथील नवानगर शाळेमध्ये वृक्षारोपण)
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक ते सात तारखेपर्यंत सुरू असलेल्या वन महोत्सवानिमित्ताने औचित्य साधत वन कार्यालय तळोधी याच्या समोरील चौकामध्ये येथे स्टॉल लावून रोपे विक्री करिता ठेवण्यात आले. तसेच फळ झाड वृक्षारोपण करुन वन महोत्सव साजरा करण्यात आला. विविध वृक्ष ठेवून त्याबद्दल वृक्ष पुरवठा करण्याबद्दल व वृक्ष लागवडीच्या फायद्याबद्दल सलग मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावातील व परिसरातील लोकांना वृक्षांचे महत्त्व विविध वृक्षांचे लागवडीचे फायदे व त्याकरिता पुरविण्यात येणाऱ्या वृक्षांच्या रोपट्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
तळोधी बाळापूर येथील नवानगर च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये विविध वृक्षांची लागवड करून “वन महोत्सव निमित्त” व “एक पेड माँ के नाम” योजने अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आला.ससदर कार्यक्रमास अजित सिंग देवरे पोलीस निरीक्षक तळोधी, ग्रामस्थ महिला/ पुरुष व शाळेतील मुलं, अरुप कन्नमवार व.प.अ. तळोधी , सर्व वन कर्मचारी, मदतनीस आदि उपस्थित होते.
