वर्धा :
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये आतापर्यंत वाघांना विशिष्ट क्रमांक देऊन त्यांची नोंद वन विभागा तर्फे केली जात होती परंतु यावर्षी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये वास्तव्य असलेले प्रत्येक वाघाची नोंद घेऊन त्याला क्रमांक देण्यात येणार आहे त्यामुळे बफर मध्ये वाघाची संख्या किती आहे हे माहित होईल. वन्यजीव विभागाच्या सूचना वरून प्रादेशिक अधिकारी यावेळेस उन्हाळ्यात ठीक ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावून वाघांची नोंद करून माहिती गोळा करणार आहेत.
बोर व्याघ्र प्रकल्प 138 चौरस कि.मी. मध्ये पसरलेला आहे यात 6 पौढ़ वाघ, दहाच्या वर बिबट, हजारोच्या संख्येत हरिण, 28 रानकुत्रे, 14 अस्वल, मोर, सांभर, रांनगव्हा, नीलगाय, आदी वन्यप्राणी व पक्षी मोठ्या संख्येत आहेत.