वाघाचा हल्ल्यात वृद्ध इसम ठार

0
201

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग): ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मोहर्ली (बफर) वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 874  मध्ये वाघाच्या हल्लात एक वृद्ध इसम ठार झाले असल्याची घटना आज दि. 08 फरवरी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहीतीनुसार शेत कुंपण करण्यास चपाट्या आणण्यासाठी मोहर्ली (बफर) जंगलात वृद्ध इसम नीलकंठ नन्नावरे व अडकू जेंघठे दोघे जंगलात गेले असता अचानक वाघाने येऊन एका वृद्ध इसमावर हल्ला करून ठार केले.

सदर घटनेत मृतकाचे नाव नीलकंठ नारायण नन्नावरे वय (59) वर्ष राहणार मोहर्ली असे आहे.
अचानक वाघाच्या हल्ला होताच जवळ असलेला अडकू जेंघठे यांनी आरडाओरडा केले. पण वाघाने नीलकंठला काही सोडले नाही व त्याला आत जंगलात 50 मीटर अंतरावर खिचत नेले. हे बघून अडकू जेंगठे लगेच गावा कडे परत आले व ग्रामस्थांना सूचना दिली व ग्रामस्थांना मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याशी सम्पर्क केले. माहीती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली संजय जुमडे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली (कोअर) व्ही.बी.सोयाम,  क्षेत्र सहाय्यक आगरझरी एस.एल.बालपाने, वनरक्षक जनबंदु,वनमजूर व ग्रामस्थ घटना स्थळी दाखल झाले.
मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या समक्ष मौका पंचनामा करण्यात आला व घटना स्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून पुढील कारवाही वनविभाग करीत आहे.

या पूर्वी देखील या परिसरात एका इसमास वाघाने ठार केले होते.वन कर्मचारी नेहमीच जंगलात जाण्यास मनाई करतात तरी सुद्धा काही कामा निमित्य ग्रामस्थ जंगलात जातात व अशा प्रकारच्या घटना समोर येतात.

तसेच दुर्गापूर पोलीस स्टेशनचे API खाडे, हेड कॉन्स्टेबल अशोक मंजुळकर, पोलीस शिपाई रवींद्र दुर्वे व सुरेश मडावी मौका पंचनामा करण्यास घटनास्थळी उपस्थित झाले व पुढील कारवाही करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here