शिकारीच्या फासेत अडकला बिबट्या

0
588

खोदशी तालुका कराड येथे एक वर्षाचा बिबट्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकला असल्याचा गावकऱ्यांना आज दिनांक 08 फरवरी 2022 रोजी सकाळच्या सुमारास लक्षात आले.
सदर घटनेची माहिती पोलीस पाटील यांना मिळताच लगेच  वनक्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. माहिती मिळताच  लगेच  वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व वनविभाग सर्व कर्मचारी वनपाल  बाबुराव कदम , सावखंडे ,वनरक्षक रमेश जाधवर हे घटनास्थळी दाखल झाले. बहेली  ट्रॅप  मध्ये अडकलेल्या बिबट्यास जाळी टाकून पकडून नंतर पिंजऱ्यात घालून सुरक्षित स्थळी हलविले.

वनविभागाचे पशुवैद्यकीय डॉ चंदन सवणे यांनी बिबट्यास इंजेक्शन देऊन पायावर उपचार सुरू केले आहेत.पाय चा पंजा तुटला असून जखम खोलवर आहे. बहेली शिकारी बहुदा या भागात आहेत , कारण लावलेली फसकी ह्याला –बहेली ट्रॅप असे म्हणतात
सर्व लोकांना आव्हान करण्यात आले की आपल्या भागात जर काही संशयास्पद बहेली शिकारी फिरत असेल तर वनविभागस सूचित करावे. सापडलेला बिबटया नर असून त्याचे साधारण वय 1 वर्ष आहे.

मध्यप्रदेश येथील बहेली जमत ही संपूर्ण भारतात वाघ शिकारी साठी खूप प्रसिद्ध आहेत व त्यांची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे तसेच ते जो सापळा वापरतात तोच वापरण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here