
ताडोबा बफर परिसरातील अंधारी नदीत पोकलँड मशीन द्वारे रेती उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती वरून वन विभागाच्या बफर क्षेत्राचे आरएफओ स्वाती महेशकर यांनी आपल्या पथक , STPF सोबत मिळून छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
यावेळी पोकलँड मशीन, हायवा गाड़ी क्र. MH34 BG 5863 जप्त करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, या आधी देखील वाळू माफिया वर तीन वेळा सापळा रचण्यात आला होता मात्र वाळू माफिया हाती मिळाले नाहीत. मात्र चौथी वेळेस आरएफओ स्वाती महेशकर सापळा सचुन दिनांक 03 नवम्बर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास छापा मारण्यात आला व पुढील कारवाही शुरू आहे.
