तळोधी परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व प्लास्टिक स्वच्छता मोहीम

0
177

वनविभाग तळोधी (बा.) व ‘स्वाब’ संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला.
तळोधी (बा.);
५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्र तथा ‘स्वाब नेचर केयर ‘संस्थेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.


यावेळेस तळोदी बाळापूर क्षेत्रातील गायमुख देवस्थानालगत रस्त्याच्या कडेला सकाळी सात वाजता ते दहा वाजेपर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली. त्यानंतर जंगल क्षेत्रात तेंदुपत्ता संकलन करायला जंगलात गेलेल्या तेंदुपत्ता संकलन करनार्या किटाळी बोदरा येथील ग्रामस्थांना जंगलात वावरताना कोणती काळजी घ्यायची व सुरक्षेबद्दल मार्गदर्शन माहिती स्वाब संस्था च्या सदस्यांचे द्वारा देण्यात आली.
त्यानंतर आलेवाही जंगल परिसरातील काशी तलाव परिसरात ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण मोहिमे अंतर्गत’ संपूर्ण तलाव परिसरातील प्लास्टिक पत्रावळी प्लास्टिक ग्लास प्लास्टिकच्या पिशव्या बाळूच्या बॉटल्स खऱ्याच्या पन्या असा प्लास्टिकचा तलाव परिसरातील कचरा गोळा करून संपूर्ण तलाव परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आले. त्यानंतर तलावाचे बाजूला वळाचे झाड व इतर झाडांची लागवड करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळेस अतीरीक्त कार्यभार असलेले वन परिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, यांच्या मार्गदर्शनात, तळोधी बा. चे क्षेत्र सहाय्यक ए.बी.वाळके, तळोधी बा. वन रक्षक एस.बी.पेंदाम, वन रक्षक एस. एस. कुळमेथे, वनरक्षक जी.डी. लोनबले, वनरक्षक व्हि.पी. येरमे, वन कर्मचारी सुनील मरस्कोले, विलास लेंडगूरे,रवी वरठे , वनमजूर आणि स्वाब नेचर केअर संस्था चे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य जिवेश सयाम, राशिद शेख, नितिन बुरांडे, सुरज भाकरे, छत्रपती रामटेके, विनोद लेंडगूरे,साहील सेलोकर,साहील अगडे, यांनी या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त च्या कार्यक्रम राबविण्यात सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here