
चंद्रपूर : भद्रावती तालूक्यातील चोरा पर्यटन कोरोना काळात बंद करण्यात आले होते ते आज दि. 07/03/2022 रोज सोमवारला मा. विभागिय वनअधिकारी प्रशांत खाडे यांचे हस्ते हिरवी झंडी दाखवून सुरु करण्यात आले आहे.
सदर पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यात वाघ व बिबट यांचा समावेश असून त्यांना आवश्यक असलेले इरई धरणांचा मुबलक पाणी असल्याने ताडोबातील पर्यटना सोबतच चोरा पर्यटन वनक्षेत्राला सर्वात जास्त पसंती मागील वर्षी पर्यटकांनी दर्शवली होती.पर्यटकांचा तोच विश्वास घेऊन नियमित पर्यटन सुरु राहावे आणि गावातील लोकांना रोजगार मिळावा व तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुध्दा रोजगार उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक उन्नती व्हावी हा उद्येश ठेऊन वन संरक्षन समीती चोरा आणि वनविभाग चंद्रपुर यांचे संयुक्त विद्यामाने पर्यटन सफारी सुरू करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला विभागिय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहाय्याक वनसंरक्षक निकीता चवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, सामाजीक कार्यकर्ते माधव जिवतोडे, सरपंच संगिता खिरटकर, वनसमिती अध्यक्ष अनिल बावणे, तोडकर, हनवते , शेख ,बबर्वे, सहारे, घुबडे व
तसेच परीसरातील नागरीक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
