
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 11 वा वर्धापन दिन साजरा
दिनांक 05 जानेवारी 2021 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 11 वा वर्धापन दिन कोयना नगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. समाधान चव्हाण, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, श्री.उत्तम श. सावंत, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर स्थित कराड, वैभव ह.फाळके, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयना, तसेच, गंगाधर कोष्टी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वीजनिर्मिती महामंडळ, सीताराम ल .झुरे, सेवानिवृत्त विभागीय वनअधिकारी इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्यातील अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, निसर्ग मार्गदर्शक, विद्यार्थी , सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम केलेले निवृत्त वनअधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी, पत्रकार या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
