कोठारी ते अक्सापुर मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज दिनांक 06 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 04 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटना ही कक्ष क्रमांक 123 मध्ये एफ.डी.सी.एम क्षेत्रात घड़लेली आहे. माहिती होताच रस्त्यावरील गर्दी बिबट बघण्यास वाढली असून वन विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व पुढील तपास शुरू आहे.