चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर व बफर क्षेत्रामध्ये बौद्ध पौर्णिमा निमित्त वन्यप्राणी प्रगणना दि. 05 मई 2023 रोजी सायंकाळ पासून ते दि. 06 मई 2023 सकाळ पर्यंत प्राणवट्यावरील वन्यप्राणी प्रगणना करण्यात आली.
सदर वन्यप्राणी प्रगणना मोहर्ली, ताडोबा, कोळसा, कोलारा , कारवा, मोहर्ली बफर, चंद्रपूर, मुलं, पळसगाव, शिवणी, खडसंगी वनपरिक्षेत्रात करण्यात आली.
यावेळेस वाघ 33, बिबट 16, चितल 1292, सांबर 299, निलगाय 46, रानगवा 200, वानर 401, रानकुत्रा 50, रान डुक्कर 383, अस्वल 25, जवादी मांजर 6, उदमांजर 4, सायाळ 7, मुंगूस 15, उडणारी खार 3, मोर 158, मगर 5, ससा 5, रान कोंमडा 23, घोरपड 1 व इतर वन्यप्राण्याची नोंद करण्यात आली.