किटाळी (बोद्रा) गावातील विहिरीत पडला बिबट

0
168

बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाच्या चमुला यश

ब्रम्हपुरी : तालुक्यातील किटाळी (बोद्रा) गावात शिकारीच्या शोधात आलेला बिबट विहिरीत पडल्याची घटना काल दिनांक चार नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ब्रम्हपुरी तालुक्यातील चारही बाजूने घनदाट जंगलाने व्याप्त असलेल्या किटाळी (बोद्रा) गावातील संतोष मेश्राम यांच्या घराजवळील विहिरीमध्ये बिबट्याच्या डरकाळीचा आवाज विहिरीजवळ असलेल्या घरातील लोकांना ऐकू आला. कशाचा आवाज आहे म्हणुन विहिरीजवळ जावून बघतात तर, काय चक्क? विहिरीत बिबट्या पडलेला दिसून आला ही माहिती वनविभागाला देण्यात आली. लगेचच घटनास्थळाकडे वनविभागाची चमूने धाव घेतली. दरम्यान, बघ्यांची एकच गर्दी जमली होती. एक ते दोन तासानंतर बिबट्याला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात वनविभागाच्या चमूला यश आले. व बिबट्याला नेण्यात आले. मात्र दिवसात घडलेल्या या घटनेने गावात बिबट व वाघाची दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here