ब्रह्मपुरी: दोन दिवसपूर्वी तोरगाव (बूज) येथील घटना ताजी असताना आज 05 नोव्हेंबर 2022 रोजी तिसऱ्या दिवशी वाघाने लाखापूर येथील जंगल परिसरात एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
सदर घटनेत मृतकाचे नाव जगन पानसे असून राहणार लाखापूर असे आहे. जगन 04 नोव्हेंबर रोजी जंगलात काड्या तोडण्यात गेले असता अचानक वाघाने हल्ला करून ठार केले. रात्री घरी परत न आल्याने त्याचा शोधा शोध केल्यास मृतदेह आढळून आला. वन विभागाला माहिती होतास वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करण्यात आला. जिल्ह्यातील वाघाच्या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.