जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येत असलेला मोहर्ली गेट येथे वन्यजीव सप्ताह निमित्त आज दि. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मोहर्ली गेट ते वडाला गावापर्यंत जिप्सी रॅली आयोजन वन विभागा द्वारे करण्यात आले.
लोकांमध्ये वन्यजीव संवर्धनाची जागरूकता वाढवण्यासाठी तसेच विद्यार्थी , लहान – थोर ग्रामस्थ व कर्मचारी यांच्यात वन्यजीव बद्दल प्रेम- प्रतिष्ठा निर्माण होण्यासाठी जिप्सी रॅली काढण्यात आली.
सदर रॅली मध्ये वाघ, बिबट, अस्वल, सांभर, चितल, मोर व ससा या वन्यजीवांचे वेशभूषा घालून वन्यजीव वाचवा, झाडे लावा झाडे जगवा असे नारे देत मोहर्ली, भांमडेली, सितरामपेठ, कोंडेगाव, मुधोली घोसरी वडाला जिप्सी रॅली काढण्यात आली.
जिप्सी रॅलीचे उद्घाटक मोहर्ली गट ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनीता कातकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
सदर कार्यक्रमात ताडोबा (कोर) उपसंचालक नंदकिशोर काळे, मोहर्ली (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. शेंडे, क्षेत्र सहाय्यक विलास कोसनकर, वन रक्षक पवन मंडुलवार, व्ही. बी. सोयम, देशमुख , मट्टामी, महाजन, पोलिस पाटिल रामकृष्ण सखारकर, भांमडेली ग्राम पंचायत उपसरपंच शामल नन्नावरे, मोहर्ली गेट पर्यटक मार्गदर्शक, चालक व मालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.