
तळोधी (बा.) यश कायरकर
तळोधी बा. वन परिक्षेत्रात अंतर्गत 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजता कोजबी माल येथील रहिवासी वासुदेव कोंडेकर या सरपन गोळा करायला गेलेल्या इसमाला येनुली (माल) बिटातील कक्ष क्र. ५६३ मध्ये वाघाने हमला करून ठार मारलेले होते. तेव्हा अंत्यविधी करिता वनविभागाच्या वतीने तात्काळ मदत म्हणून २०,०००/- (विस हजार) रुपये देण्यात आले होते.
आज पुन्हा त्या प्रित्यर्थ स्वानुग्रहराशी ४,८०,००० (चार लाख अंशी हजार) चं चेक त्यांचा पत्नी श्रिमती सुशिला वासुदेव कोडेंकर यानां सुपुर्द करतानां करन्यात आले. या वेळी खोजराम मरसकोल्हे सदस्य जि.प. चंद्रपुर, दिपेश मल्होत्रा उपवन अधिकारी, श्रिमती शेवंताबाई सोमाजी भोयर सरपंच, रविन्द्रनाथ पर्वते उपसरपंच, विशाल गोपाले, जगदीश सडमाके आणि कोडेंकर परीवार उपस्थिति होते.
