नवरगाव येथे चिकन सेंटरवर सापडले रानडूकराचे मास

0
1597

वन्यप्राणी रानडुक्कराची शिकार करणे बाबत एका आरोपीस दि.०७/०२/२०२२ पर्यंत वन कोठडी

दिनांक ०४/०२/२०२२ ला सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजा नवरगाव येथे वन्यप्राणी रानडुक्कराची मांस विक्री करण्याच्या हेतूने ओम चिकन सेंटर नवरगाव येथे आरोपी श्यामसुंदर घनश्याम येवनकर रा.गिरगाव वय ४५ वर्ष यांना वन कर्मचाऱ्यांनी रानटी डुक्कराच्या मांसासह पकडले.

सदर घटनास्थळी मोका पंचनामा,जप्तीनामा नोंदवून आरोपी विरुध्द वन्यजीव (संरक्षण)अधिनियम,१९७२ चे कलम ९,३९,४४,४८,५१ अन्वये प्राथमिक अपराध क्रमांक ०९११०/२२७७३१ दि. ०४/०२/२०२२ अन्वये वनगुन्हा नोंदविला. सदर आरोपीस आज दिनांक ०५/०२/२०२२ रोजी अटक करून प्रथम श्रेणी न्यायालय सिंदेवाही येथे विद्यमान न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष उपस्थित केले असता आरोपीची दिनांक :- ०७/०२/२०२२ पर्यंतची वन कोठडी मंजूर केली.

सदर प्रकरणाचा पुढील तपास श्री.दीपेश मल्होत्रा उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग,श्री.वाकडे साहेब सहायक वनसंरक्षक ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी,सिंदेवाही हे  सुनील बुल्ले क्षेत्र सहाय्यक नवरगाव, नितेशकुमार शहारे, जीतेंद्र वैद्य , दिवाकर गुरनुले वनरक्षक ,कमलाकर बोरकुंडावर व  दीपक बालुकवार वाहन चालक यांचे मदतीने करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here