चंद्रपूर : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, चंद्रपुर (वन अकादमी ) येथे आयोजित कार्यशाळा मध्ये अविनाश कुमार यांच्या संचालक मार्गदर्शनात क्रांतीज्योती, ज्ञानाई, स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्य विविध प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलीत करुन पुष्प माल्यार्पण करून त्यांच्या कार्यावर आधारित मार्गदर्शन व सादरीकरण करण्यात आले.
कर्मचारी, कामगार, प्रशिक्षणार्थी यांना जीवन जगत असतांना प्रथमोपचार प्रात्यक्षिकेद्वारे व प्रबोधनात्मक डॉ. किरण जानवे बी.एल.एस. श्यासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपुर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून राक्तदात्यांनी रक्तदान राष्ट्रीय कार्यात सहकार्य करण्यात आले. संजीवन रक्त पेढी चमुनी योगदान दिले.
सदर कार्यक्रमास लाभलेले मार्गदर्शकाना बांबू निर्मित वस्तू प्रदान करुन सत्कार करण्यात आले. तसेच जयंती उत्सव यशस्वितेकरिता कर्मचारी, कामगार, प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केले व आकाश मल्लेलवार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आभार मानले.