ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मार्गदर्शक श्रेणीकरण परीक्षेत बंडू कुमरे प्रथम तर शहनाज बेग द्वितीय

0
1042

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कार्यरत पर्यटक मार्गदर्शकांची श्रेणीकरण परीक्षा नुकतीच संपन्न झाली आणि या परीक्षेचा निकाल घोषित झाला असून सदर श्रेणीकरण परीक्षेत पर्यटक मार्गदर्शक बंडू कुमरे यांनी 86% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर शहनाज बेग यांनी 80 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) येथील मार्गदर्शकांची गुणवत्ता व दर्जा उंचावण्यासाठी सदर श्रेणीकरण परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मोहर्ली (37) कोलारा (23), खुटवंडा (6), नवेगाव (7), झरी (9), पांगड़ी (10) येथील गेटवर कार्यरत एकूण 92 मार्गदर्शकांनी सहभागी झाले होते.

या श्रेणीकरणामुळे मार्गदर्शकांस मिळणाऱ्या या शुल्कात वाढ करण्यात आली असून A श्रेणीच्या मार्गदर्शकाला
500 रु, B श्रेणीला 450 रु, तर C श्रेणीला 400 रु शुल्क मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here