सातारा तुकुम येथे दोन अस्वलीच्या हल्लात चार जण जखमी, तर दोन गंभीर जखमी

0
338

यश कायरकर :

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सातारा तुकुम येथील कक्ष क्रमांक-436, कक्ष क्रमांक-435 येथे आपआपले गुरे चरायला नेणे असता दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने हल्ला केला असता पहिल्या घटनेत सातारा तुकुम कक्ष क्रमांक-436 येथे गुरे चारणार्‍या 57 वर्षीय आणि 54 वर्षीय अस्वलाच्या हल्लात गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम कक्ष क्रमांक-435 (FDCM) गुरे चारणार्‍या 45 वर्षीय आणि 32 वर्षीय अस्वलाच्या हल्लात जखमी झाले. हि घटना 1 वाजताच्या सुमारास घडली.


सविस्तर वृत्त असे की, सातारा तुकुम येथील विलास तुकाराम पेंदोर वय 54, सीताराम किसन मडावी वय 57 यांनी कक्ष क्रमांक-436 (रेगुलर) गुरे जंगलात चारण्याकरीता नेले असता दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाच्या केलेल्या हल्यात गंभीर जखमी झाले.
तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम येथील प्रफुल रघुनाथ सिडम वय- 45 रा. सातारा तुकुम, रुपेश गजानन कुळमेथे वय. 32 रा.भानसी ता. सावली यांनी सातारा तुकुम कक्ष क्रमांक-435 (FDCM) गुरे जंगलात चारण्याकरीता नेले असता दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाच्या केलेल्या हल्यात जखमी झाले.
सदर घटनेची माहिती वनविभागास दिली असुन वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी व जखमी पर्यंत पोहचले. ४ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. गंभीर जखमी विलास तुकाराम पेंदोर यांच्या कुटुंबांना वनविभाग कर्मचारी मडावी यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here