महाराष्ट्रात प्रथमच दुर्मिळ वॉलरस (WALRUS) (ओडोबेनुस रोझमरुस) या प्राण्यांचे दात (IVORY TUSK) तस्करी करणारे व Eratiga चार चाकी गाडी जप्त करण्यात वनविभाग रत्नागिरीला यश

0
775

वनविभाग रत्नागिरी , सातारा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रत्नागिरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून 31.08.2021 रोजी रात्री 9 वाजता मोजे. हातखंबा, ता.जिल्हा रत्नागिरी येथे वन्यप्राण्यांच्या तस्करी बाबत काही आरोपींना सापळा रचून संयुक्तपणे कारवाई करण्यात आली होती यात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते मोहहमद नुमान यासिन नाईक रा.कोनाडी, पेरमेम, उत्तर गोवा वय 41वर्ष, हेमंत सुरेश कांडर रा.बावशी ,कणकवली,सिंधुदुर्ग वय 38 वर्ष, राजन दयाळ पांगे रा.परवाडी,मालवण,सिंधुदुर्ग वय 58 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे.


आरोपीकडून महाराष्ट्रात प्रथमच दुर्मिळ असे वॉलरस (WALRUS) (ओडोबेनुस रोझमरुस) या प्राण्यांचे दात (IVORY TUSK) व ईरटीगा चार चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
तपास दरम्यान आरोपींकडून आणखी काही मोलाची वन्यजीव अवयव दि.02.09.2021 रोजी रात्री 8 वाजता केलेल्या कारवाई मध्ये आणखी तीन आरोपी पकडण्यात वनविभागास यश आले, त्याच बरोबर सदर तीन आरोपीं कडून एक जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे.

सदर कारवाही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर डॉ. क्लेमेंट बेन, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग , विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, पोलीस निरीक्षक हेमांतकुमार शहा, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, सहायक वनसंरक्षक सचिन निलाख यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक रत्नागिरी श्रीमती प्रियांका लगड, सातारा वनक्षेत्रपाल सचिन डोंबळे ह्यांनी संयुक्तपणे कारवाही मध्ये सहभाग घेतला.
वनपाल दिलीप आरेकर,गौतम कांबळे,दीपक शिंदे, वनरक्षक सागर पताडे,संजय रणधीर,आकाश कडूकर,विक्रम कुंभार,तसेच पोलीस हवालदार प्रशांत बोरकर, शांताराम झोरे, WCCB कॉन्स्टेबल विजय नांदेकर ह्या सर्वांनी मोलाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here