शेतात काम करीत असणारा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात किरकोळ जख्मी

0
718

तळोधी बा.;

तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाही बिटातील कक्ष क्रमांक ७०४ बिटालगत, शेतात गट क्रमांक.११० मध्ये शेती काम करण्यास गेलेल्या सुर्यभान बोंडकू सुखदेवे वय(६४), यांना  सकाळी ११;३० वाजताच्या सुमारास वाघाने अचानक हल्ला करून किरकोळ जख्मी केला.


जखमीला उपचाराकरिता वाढोणा येतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले व त्यानंतर प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला पाठविण्यात आले.  सदर घटनेची माहिती वन विभागाला  मिळतात वनरक्षक एस. बी. पेंदाम यांनी दवाखान्याला भेट देऊन समोरील उपचाराकरिता जखमीला चंद्रपूरला रवाना केले.
व नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाली एस. कडनोर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक के .डी. गरमडे, वनरक्षक एस.बी.पेंदाम यांनी मौका पंचनामा केला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल डोर्लीकर, ‘स्वाब’ चे अध्यक्ष यश कायरकर हे उपस्थित होते.
सदर शेती गट क्रमांक ११० हा शेत जंगलालगतच फक्त ३ मिटरच अंतरावर असुन सदर शेतकरी हा शेतात वाकून काम करीत असल्यामुळे तिथून जातांना वाघाला अन्य वन्यजीव असल्याचा भास होऊन वाघाने त्याच्यावर हमला केला असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते.  मात्र सोबत असलेल्या पत्नीने व जखमी आरडाओरडा केल्यामुळे वाघ हा घटना स्थळावरून पसार झाला.
सदर घटनेतील वाघ हा वाघाचा छावक असल्याचे घटना स्थळावरून निदर्शनास आले.
वनविभागा तर्फे आलेवाही बिट परिसरात गस्त  वाढविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here