2018 च्या व्याघ्र गणना संरक्षणात देशात वाघाची संख्या वाढत असल्याची नोंद आहे त्यात 2967 वाघांची नोंद करण्यात आली असून जगभरातील एकूण व्यग्र संख्येच्या 75 % आपल्या देशात आहे तसेच महाराष्ट्रात वाघांची संख्या असलेल्या देशात पाचव्या क्रमांकावर आहे. अशा वेळेस 2021 मध्ये देशात 126 वाघांची मृत्यूची अधिकृत माहिती NTCA ने दिली आहे.
यात मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर असून वाघांचा मृत्यू 44 आहे तर महाराष्ट्रात 26 एवढी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCA च्या आकडेवारीनुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंत शिकार, अपघात आणि नैसर्गिक कारणामुळे वाघांचा मृत्यू झाला आहे.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. जगभरातील वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव वर काम करणारी संस्था, वनविभाग अतोनात प्रयत्न करून व्याघ्र संवर्धन करत आहे. ज्यामुळे एकट्या भारतात वाघांची संख्या वाढलेली आपण बघत आहो तर एकीकडे अप्राकृतिक रित्या वाघांचे मृत्यू होत असल्याचे दिसत आहे.
2021 मध्ये महाराष्ट्रात जानेवारी 6, फेब्रुवारी 2, मार्च 7, मे 1, जून 1, जुलै 1, नोव्हेंबर 3, डिसेंबर 4 असे एकूण 26 वाघांची मृत्युची नोंद NTCA च्या आकडेवारी नुसार दिसून येत आहे. यापैकी वन संरक्षणाच्या क्षेत्रात मृत्यू झालेले 6 वाघ आहे तर 20 वाघ संरक्षणाच्या हद्दी बाहेर मृत्यू झालेले आहे. वाघांचे मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंतेचा विषय असून वाघांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात यावे, असे आवाहन वन्यजीव प्रेमी करत आहे.