तळोधी परिक्षेत्रात रेल्वे धडकेत एक युवा मादा रानगाव्याचा मृत्यू

0
109

जिल्हा प्रतिनिधि:
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्रातील तळोदी क्षेत्रातील आलेवाही बीटातील कक्ष क्रमांक 97 लगत चंद्रपूर – ब्रह्मपुरी रेल्वे मार्गावरील रेल्वेने दिलेल्या धडकेमुळे एक रानगवा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली त्यांनी याबाबत घटनेची माहिती वन विभागाला दिली तात्काळ वन कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन मोक्का पंचनामा केला असता मृत रानगव्हा ही अंदाजे तीन वर्षे वयाची मादा असल्याचे लक्षात आले. तिला मागील भागावर रेल्वेने धडक दिल्यामुळे रेल्वे रुळाच्या बाजूला ती पडून तिचा मृत्यू झाला हे घटनास्थळाची पाहणी करता लक्षात आले.

यानंतर शिंदेवाही/नवरगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरपाम यांच्या हस्ते शवविच्छेदन करून जेसीबीच्या साह्याने खड्डा करून रानगव्याला घटनास्थळी पुरण्यात आले.

यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, NGO प्रतिनिधी यश कायरकर स्वाब नेचर केअर फाउंडेशन, क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाड, पी. आर.टी. सदस्य व वनमजूर इत्यादी उपस्थित होते. वन गुन्हा नोंद करून समोरील कारवाई करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर सतत रेल्वेच्या धडकेमध्ये वन्यजीवांचे जीव जाणे हे नित्याचीच बाब ठरली असून, काही दिवसापूर्वी 31 जुलै ला याच परिसरात  गंगासागर (हेटी) बीटातील 97 – 98 च्या कंपार्टमेंटच्या सीमांकन लाईनवर नागभिड- बल्लारशा रेल्वे मार्गावर तळोधी रोड- आलेवाही किलोमीटर 1152/03 मध्ये N/BOX या मालगाडीच्या धडकेत रानगवा ठार झाल्याची घटना घडली होती. त्यापुर्वी सुद्धा याच रुट वर मिंडाळा बिट मध्ये,नागभीड वनपरिक्षेत्रामध्ये एक वाघ तर याच आठवड्यात मूल जवळ एक अस्वल, अर्जुनी मोरगाव येथे एक अस्वल तर काही दिवसांपूर्वी घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच रेल्वेच्या धडकेमध्ये 5 चितळ मृत झाल्याच्या घटना उघडकीस आली होती. अशा पद्धतीच्या रेल्वेच्या धडकेत वन्यजीव मेल्याच्या घटना ह्या सतत घडत असतात. त्यामुळे या परिसरात किंवा कुठल्याही जंगल परिसरातून रेल्वे मार्गावर वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना घडू नये म्हणून रेल्वे विभाग व शासनाने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
“मिंडाळा ते चंद्रपूर पर्यंत (जवळपास शंभर किलोमीटर पर्यंत) घनदाट जंगलातून ब्रह्मपुरी- चंद्रपूर हा रेल्वे मार्ग गेलेला आहे त्यामुळे या रेल्वे रूट वर सतत अशाप्रकारे वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना रेल्वे धडके मध्ये घडत असतात. तरी ह्या टाळून नेण्याकरता वन विभाग, रेल्वे प्रशासन, व शासनाने उपाय योजनेत करणे गरजेचे असून. प्राण्यांना रेल्वे खालून ये जा करण्याकरता काही मीटर अंतरावर अंडरपास असणे गरजेचे आहे यामुळेच वन्यजीव मृत्यूच्या घटनावर नियंत्रण मिळवता येईल.” यश कायरकर वन्यजीव अभ्यासक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here