नागभीड वन परिक्षेत्रातील चिंचोली शिवारात विहिरीत पडलेल्या वाघिणीच्या बछड्याची सुरक्षित सुटका

0
511

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :
ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वन परिक्षेत्रातील चिंचोली या एक घराचा गाव असलेल्या गावा शेजारी मागील बाजूस जंगलाला लागून असलेल्या सलीम भाई करिया यांच्या शेताच्या कडेला असलेल्या विहिरीत दोन ते तीन महिन्याचा वाघिणीचा बछडा विहिरीत पडल्याची घटना  आज दि. 2 ऑक्टोंबर 2024  रोजी सायंकाळी निदर्शनास आली.
शेतमजूर विहिरीजवळ गेला असता त्याला बछडा विहरीत पडले असल्याचे बघितल्या नंतर लगेच सदर घटनेची सूचना वनविभागाला देण्यात आली.
वन परीक्षेत्राधिकारी अरुण कन्नमवार यांच्या सोबतच घटना स्थळी तळोधी बा. व नागभिड वन परिक्षेत्रातील टिम उपस्थित झाले व सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित रित्या विहिरीत पडलेल्या बछड्याला बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर घटना स्थळापासून जवळच त्या बछड्याला ठेवण्यात आले काही वेळानंतर बछडा आपल्या आई सोबत सुरक्षित जंगलात निघून गेला.
यावेळी वनविभागाचे अधिकारी तळोधी वन परिक्षेत्रातील मने, भरणे, मांठरे तर नागभिड वन परिक्षेत्रातील चे सय्यद, कुथे, जिवतोडे, ढाकणे मैडम, स्वाब संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, शरद गभने, व सदस्य, झेप निसर्ग मित्र संस्थेचे पवन नागरे, पराग भानारकर, क्षितीज गरमडे व सदस्य, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर  घटना स्थळी  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here