सुंदर, गुणकारी, मात्र दुर्लक्षित आणि संकटग्रस्त संपुष्टात येण्याच्या मार्गावर, ‘कळलावी’

0
259

(ही औषधी वनस्पती जगवण्यासाठी अमरावतीत विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे.)
यश कायरकर ;
अतिशय सुंदर नक्षीकाम केलेल्या लाल, पिवळ्या रंगाचं आणि एखाद्या बाहुलीच्या हातागत आकाराचं प्लास्टिक च्या फुला सारखे भासणारे ‘कळलावी’ हे फूल.डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर, मुरमाड जमिनीवर आढळणारी ‘कळलावी’ ही झुळूकवर्गीय वनस्पती आहे. जंगलात एखाद्या झुडूपाच्या आधाराने वाढनार्या या वनस्पतीच्या फुलांचा आकार गौरीच्या हाताप्रमाणं दिसत असल्यानं हिला अनेक ठिकाणी ‘गौरीचे हात’देखील म्हणतात. फुलांच्या पाकळ्यांची टोकं तांबडी आणि मधला भाग पिवळा असल्यानं काही भागात अग्निज्वाला, तर दुरून समईची ज्योत ठेवल्यासारखी दिसत असल्यानं कुठं हिला ‘अग्निशिखा’ म्हणून ओळखलं जाते. ‘अग्निशिखा’ या वनस्पतीला अग्निमुखी, कलहारी, गौरीचे हात, नखस्वामी, बचनाग, अशा अनेक नावांनी ओळखल्या जातो. ‘ग्लोरिओसा सुपरबा’ असं कळलावीचं सायंटिफिक नाव आहे.
घरात नेलं तर महिलांमध्ये भांडणं लागतात, अंधश्रद्धा आणि असा अपप्रचार करण्यात येतो. मात्र महिलांना ‘प्रसूतीदरम्यान कळा’ येण्यासाठी अतिशय उपयुक्त ही कळलावी औषधी ( Ayurvedic Medicine ) माणसांच्या अनेक आजारांवर अतिशय महत्त्वाचं औषध आहे. संपूर्ण विदर्भात जंगल परिसरात विरळ प्रमाणात ही बहरली आहे, ही वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर असताना अमरावती परिसरात जंगलात ही चांगल्या प्रमाणात बहरली आहे. संकटग्रस्त यादीत समाविष्ट असणाऱ्या या ‘कळलावी’ वनस्पतीच्या संवर्धनासाठी अमरावती परिसरात वनस्पती शास्त्र अभ्यासक सरसावले आहेत. अमरावती जिल्हाभरात जिथं सध्या कळलावी आढळून येत आहे, त्या सर्व भागात त्याच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवला जात आहे.


आधी पोळ्याच्या बैलाच्या शिंगावर सजविण्यासाठी, आणि मारभतीच्या दिवसी घराच्या बाहेर दारावर लावून भोजारा मागण्या करीता खेळे गावातील लोक जंगलातून शतावरी च्या फांद्या सोबत तोडून आनायचे, मात्र आता ही प्रथा विरळ झालेल्या या वनस्पती मुळे कमी दिसते, आता ही गणेशोत्सव काळात सुंदर अशी लाल लालपिवळी फुलं तोडून आणली जातात.
*कळलावीचे औषधी गुण* : कळलावी ही वनस्पती मुळात विषारी असून सूज येणं, संधिवात, विंचू किंवा सर्पदंश, त्वचेवरील व्रण, जखमा, मुरूम, मुळव्याध, कुष्ठरोग, पोटाचे विकार, वंध्यत्व, वेदनाशामक, सुलभ प्रसूतीसाठी लाभदायक आहे. ‘कळलावी’च्या कंदाचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी होत असल्यानं कंदाची खूप मोठ्या प्रमाणात तस्करी वाढली आहे. ‘तसेच ही *वनस्पती विषारी* असल्यानं चुकीच्या पद्धतीनं सेवन केल्यास उलट्या जुलाब लघवीद्वारे रक्तस्त्राव असे दुष्परिणाम आढळतात. यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनातच कळलावीचा वापर करायला हवा.’
‘कळलावी’ ही वनौषधी महिलांची प्रसूतीसंबंधी समस्या, त्वचाविकार, संधिवात, पोटाचे विकार आदी विविध व्याधींवर हमखास उपाय म्हणून ओळखली जाते. ही औषधी वनस्पती जगवण्यासाठी अमरावतीत विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे.
कळलावी’ बद्दल अंधश्रद्धा : महिलांना प्रसूती दरम्यान येणाऱ्या ‘प्रसुती कळा’ सुलभ व्हाव्यात, यासाठी या वनस्पतीच्या लेपाचा वापर अनेक जाणकार पूर्वी करत होते. आजदेखील काही ग्रामीण भागात प्रसूती कळांसाठी कळलावीचा वापर केला जातो. यामुळे या वनस्पती चे नाव हे ‘कळलावी’ असे पडलेले होते. मात्र या वनस्पतीचं फुल घरी आणल्यास, वनस्पती घरी किंवा बागेमध्ये लावल्यास, घरी भांडण तंटे होतात, असा अपप्रचार झाल्यामुळे भांडण लावणारी ‘कळलावी’ म्हणून देखील ही वनस्पती ओळखली जाते.’कळलावी’ भांडण लावणारी नाही, तर ‘व्याधिमुक्त’ करणारी वनस्पती आहे.
कळलावी संवर्धन प्रकल्प:
माहिती आधारे गत पंधरा वर्षांपासून अमरावती शहरालगतच्या जंगलात ‘कळलावी’ आढळून आली नव्हती. यावर्षी मात्र छत्री तलाव भानखेडा परिसरातील जंगलात ‘कळलावी’ जिकडंतिकडं बहरली आहे. मेळघाटाच्या हिरव्यागार जंगलात लाल पिवळ्या रंगाची ‘कळलावी’ उठून दिसत आहे. ही वनस्पती ‘रेड लिस्टेड’ अर्थात संकटग्रस्त वनस्पतींच्या यादीत आहे. यावर्षी जिल्ह्यात जिथं मोठ्या प्रमाणात ‘कळलावी’ दिसत आहे, त्यावर ‘कळलावी’चा अभ्यास करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसह खास प्रकल्प राबवत असल्याची माहिती आहे. या प्रकल्पांतर्गत ‘कळलावी’ झाडाची घनता किती आहे, याची आम्ही मोजणी करत आहोत. या वृक्षाला कुठल्या भागात वाढण्यास पोषक वातावरण आहे, याची माहिती देखील घेत आहोत. या वृक्षाची अमरावती शहरालगतच्या जंगलात किती मुबलकता आहे आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘कळलावी’ किती मुबलक प्रमाणात आहे, याचा अभ्यास देखील आम्ही या प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here