
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पातानील हत्ती कॅम्प मधील ३ पाळीव हत्तीचे गुजरात मधील जामनगर येथे एका प्राणी संग्रहालयात आज दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास एका बंदिस्त वाहनातून स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे व तसेच हत्तीला नेत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.
प्राप्त माहितीनुसार गुजरात येथील जामनगर येथे सुरू होत असलेल्या प्राणी संग्रहालयात ३ हत्तींना राधे क्रिष्णा एलिफंट वेल्फेअर ट्रस्टची ३ वाहनाचा सहाय्याने जामनगरच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
पातानील येथील नागरिकांवर कधीच हिंसक हल्ला केले नाही दुसरीकडे हत्तीला स्थलांतर करण्यापेक्षा येथेच एक मिनी एलिफंट पार्क उभारण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
